
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात देखील सुरक्षा उपाययोजनेची अधिक गरज
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात सुरक्षेची उपाययोजना असली तरी ती आणखी सुरक्षित करणे गरजेचे आहे या विभागाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे . येथील अग्नीविरोधी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाल्याने रुग्णालयाच्या फायर ऑडिटबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील अतिदक्षता नवजात शिशु केयर सेंटर कार्यरत आहेत. या सेंटरमध्ये १५ नवजात बालकांना ठेवण्याची क्षमता असून सध्या १०बालकांची काळजी घेतली जात आहे. . या विभागात एखाद्यावेळी आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे, या हेतूने फायर ऑडिट होणे गरजेचे बनले आहे. कारण या विभागाकडे जाण्यासाठी एकच जीन्याचा मार्ग आहे. या ठिकाणी अग्निरोधक सिलेंडरचीही संख्या वाढवण्याची गरज आहे . जिल्हा शासकीय रुग्णालयात असे प्रसंग उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे
www.konkantoday.com