कोरोनाच्या विळख्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सापडत असल्याने चिंता वाढली
रत्नागिरी शहरात कोरोनाचे रूग्ण सापडत असतानाच कोरोनाचा विळखा बसत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. शासकीय कोविड रूग्णालयात कोरोना वॉर्डची जबाबदारी सांभाळणार्या एका वैद्यकीय अधिकार्याचा अहवाल काल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर याआधी जबाबदारी सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी सतत काही महिने काम करत असल्याने रजेवर गेले आहेत. त्यामुळे कोविड रूग्णालयात देखील चिंतेचे वातावरण आहे. रत्नागिरी येथील खाजगी रूग्णालयात काम करणार्या वैद्यकीय अधिकार्याला कोरोना झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोना झाला आहे. या शिवाय शासकीय रूग्णालयात काम करणारे आरोग्य सेवक देखील कोरोनाग्रस्त होत आहेत. काल रत्नागिरी शहरात २७ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. गयाळवाडी, कर्ला, शिवाजीनगर, गवळीवाडा, मारूती मंदीर येथील व अन्य ठिकाणी सापडलेले रूग्ण हे आरोग्य सेवक आहेत. जिल्ह्यातही अनेक भागात काही खाजगी व वैद्यकीय अधिकार्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
www.konkantoday.com