रत्नागिरीत शिवसेनेने व्यंकप्पा नायडूंचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला
काल लोकसभेच्या सभागृहात खासदारांच्या शपथविधीच्यावेळी सातार्याचे उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शिवाजी महाराज की जय, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यावरून सभापती व्यंकप्पा नायडू यांनी आक्षेप घेत हे सभागृह असून याची नोंद होत असते, अशा घोषणा करू नका असे सांगितले होते. नायडू यांच्या या वक्तव्याचा आज रत्नागिरीत खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी नायडू यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख विकास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, प्रमोद शेरे, नगरसेवक व अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com