
चारकमान्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी माजी खासदार नीलेश राणे यांची मागणी
अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्धोक व्हावा झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सावधगिरीच्या सर्व उपाय योजना राबविल्या पाहिजेत. चारकमान्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.कोकणी माणसांसाठी कोकण रेल्वे हा एक विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय राहिला आहे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये कोकणी माणसाला त्याच्या गावी सुखरूप जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह व्यवस्था करून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे त्यानी म्हटले आहे
www.konkantoday.com