विनामास्क फिरणार्या २३६ जणांवर चिपळूण नगरपालिकेची कारवाई
चिपळूण शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत या कारवाईतून १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ही कारवाई न.प. प्रशासनाने सुरू ठेवली असून दंडाची रक्कम भरण्यावरून अधिकार्यांशी हुज्जत घालणार्या पाच व्यावसायिकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com