
राज्यातील धरणांमध्ये केवळ 63 टक्के उपयुक्त पाणीसाठा
मान्सूनने यंदा देशातून दोन आठवडे आधीच काढता पाय घेतल्याचे हवामान खात्याने नुकतेच जाहीर केले आहे. अर्थात पावसाळा संपला आहे. मात्र राज्याच्या द़ृष्टीने चिंतेची बाब म्हणजे पावसाळा संपत असताना राज्यातील धरणांमध्ये केवळ 63 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 90 टक्के होता. मराठवाड्याची अवस्था तर यंदा चिंताजनक आहेच; पण पुणे, नाशिक आणि अमरावती विभागालाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. एकूणच आगामी साडेसात महिन्यांत राज्याच्या राशीला ‘पाण्याची साडेसाती’ लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यात साधारणत: एक जून ते 15 ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी समजला जातो. त्यातही ऑक्टोबरमधील पंधरा दिवस हे परतीच्या पावसाचे समजले जातात. मात्र मान्सूनने यंदा पंधरा दिवस आधीच परतीची वाट धरल्याचे एव्हाना स्पष्ट झाले
www.konkantoday.com