
रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग नियायत सोडत जाहीर काही इच्छुक उमेदवार निराश तर काही आनंदात
रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृह येथे प्रभाग निहायत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती मात्र यातील काही वार्ड स्त्रियांसाठी आरक्षित झाल्याने तर काही ठिकाणी आरक्षण पडल्याने अनेकांची निराशा झाली आहे तर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या नगरपरिषद निवडणुकीत शिंदे शिवसेना व भाजप व अजित पवार राष्ट्रवादी एकत्रित महायुतीच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे तर विरुद्ध बाजूने महाविकास आघाडी रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे आता आरक्षणे जाहीर झाल्याने कोणत्या पक्षातर्फे कोणते उमेदवार उभे राहणार याकडे आता लक्ष लागले आहे व इच्छुकांचे भाऊ गर्दी वाढणार आहे
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
प्रभाग क्र. १-
जागा अ- सर्वसाधारण स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. २
जागा अ- सर्वसाधारण स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३
जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४-
जागा अ- सर्वसाधारण स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५
जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
जागा ब- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र. ६ –
जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
जागा ब – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र. ७ –
जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
जागा ब – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र. ८-
जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जागा ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ –
जागा अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण
जागा ब- सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र. १०-
जागा अ- सर्वसाधारण स्त्री
जागा ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११ –
जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
जागा ब – सर्वसाधारण स्त्री
प्रभाग क्र. १२ –
जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ –
जागा अ- सर्वसाधारण स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ –
जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १५ –
जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
जागा ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६ –
जागा अ – सर्वसाधारण स्त्री
जागा ब – सर्वसाधारण




