रत्नागिरीत विविध भागात कोरोनाचा हळुहळू शिरकाव
रत्नागिरी शहरातील विविध भागात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. रत्नागिरी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचार्यांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये एका महिला कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या महिलेला कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र तिचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरातील काल आलेल्या अहवालात रत्नागिरी शहरातील झारणी रोड, जुना माळनाका येथील डॉक्टर आरोग्यमंदिर सिव्हिल हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, खाजगी रूग्णालयातील एक डॉक्टर, नर्स कोरोनाबाधित सापडले आहेत.
www.konkantoday.com