महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग
ठाकरे सरकारमधील शिवसेना मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
मुंबईतील लीलावती रुग्णालयात अब्दुल सत्तार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर काल सायंकाळी सत्तार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने अब्दुल सत्तार यांच्यावर घरीच उपचार होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल, असे ट्वीट अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
www.konkantoday.com