अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी, अशा सूचना विद्यापीठांना आणि इन्स्टिट्यूटना देण्यात आल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयात एआयसीटीईची माहिती
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी, अशा सूचना विद्यापीठांना आणि इन्स्टिट्यूटना देण्यात आल्या आहेत अशी माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मुंबई उच्च न्यायालयात दिली.विद्यापीठ अनुदान आयोगाला विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे अथवा रद्द करण्याचे अधिकार आहेत राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा दावा करत धनंजय कुलकर्णी यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.
या याचिकेवर एआयसीटीईच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात असे म्हटले आहे की विद्याथ्र्यांच्या हितासाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्याथ्र्यांची सुरक्षितताही विचारात घेतली जाणार आहे. एआयसीटीईने सर्व डीम्ड विद्यापीठे, तांत्रिक संस्था आणि एआयसीटीईशी संबंधित पॉलिटेक्निकला युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली आहे.
www.konkantoday.com