
खेड भरणे रोडवर एसटी डेपोसमोर बोलेरो गाडीने धडक दिल्याने सायकल स्वाराचा मृत्यू
खेड शहरातील भरणे ते खेड रोडवर एसटी डेपोसमोर बोलेरो गाडीने धडक दिल्याने सुनील धोंडू भालेकर (४५)याचा मृत्यू झाला
खेड बाईतवाडी येथील राहणारा सुनील भालेकर हा भरणे नाका ते खेड या रस्त्यावरून सायकल घेऊन जात असता नातूनगर इरिगेशन कॉलनीत राहणारा नीलेश शिंदे हा आपली बोलेरो गाडी घेऊन भर वेगाने येत असता त्यांच्या गाडीची धडक सायकल स्वार सुनील भालेकर याला बसली त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला या अपघात प्रकरणी बोलेरोचा चालक नीलेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे
www.konkantoday.com