
मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायासमोर गाऱ्हाणे का मांडले -प्रवीण दरेकर
मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार विचारतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी पंढरपुरात जाऊन कोरोना नष्ट कर, असे गाऱ्हाणे विठुरायासमोर का मांडले, असा प्रतिप्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच सध्याच्या काळात आपल्या देव-देवतांच्या आशीर्वादाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
www.konkantoday.com