कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन

कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या नॅनो स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागानं एक ‘फॅब्रिक स्प्रे’ची निर्मिती केली आहे. हा फॅब्रिक स्प्रे कपड्यांवर वापरायचा असून तो व्हायरस कवच म्हणून काम करतो. फॅब्रिक स्प्रेमुळे घातक विषाणूंपासून संरक्षण मिळतं, असा दावा या विभागाचे किरण कुमार शर्मा यांनी केलाय.फॅब्रिक स्प्रे हा वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. आपण घरातून बाहेर जाताना कपड्यांवर स्प्रे करायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण परफ्यूम वापरतो तसाच याचा वापर असणार आहे.हा स्प्रे कपड्यांवर मारला की एक प्रकारे जाळी तयार होते. त्यामुळं काय होतं तर कोरोनाचा विषाणू कपड्यांवर पडला तर तो केवळ 15 ते 20 मिनिटांत नष्ट होतो असं शर्मा यांनी सांगितलं. ज्या कपड्यांवर हा फॅब्रिक स्प्रे वापरला आहे ते कपडे धुवेपर्यंत आपल्याभोवती सुरक्षा कवच प्रमाणे हा स्प्रे काम करतो..व्हायरस कवचच्या जगातील आघाडीच्या प्रयोगशाळेत चाचण्यात घेण्यात आल्या. यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रीय करण्याचा गुणधर्म असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अमेरिकेतील बीएसएल 4 या जगातील आघाडीच्या लॅबमधून निघालेले निष्कर्ष जगभर मान्य केले जातात. त्या लॅबमधून देखील या स्प्रेच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झालं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button