मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार
राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातलं असताना मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधींचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. असा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांच्या ७ जणांच्या टोळीला अन्न आणि औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली आहे.
हे विक्रेते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. ही टोळी कोरोनावर असलेले उपचार करण्यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन ३०ते ४० हजार रुपयांत विकत होते. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना रुग्णांवर परिणामकारक असलेले रेमडेसीविर इंजेक्शन ज्याची किंमत ५ हजार रुपये आहे, ते इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपयात विकत हाेते
www.konkantoday.com