
सिंधुदुर्गात सुरू झाले खासदार पुत्रावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण
सिधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेत खासदार विनायक राऊत यांच्या मुलाला गितेश राऊत यांना कणकवली येथील चौकात पोलिसांनी पुढे रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गावरून जाण्यास सांगितले असता यावरून वाद होवून राऊत यांच्या मुलाने पोलिसांशी वादावादी केल्याचा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून याबाबत आता माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. याबाबत राणे यांनी खासदार राऊत यांच्या मुलावर पोलिसांना दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र एकीकडे असा आरोप होत असताना खासदार राऊत यांचे चिरंजीव गितेश यांनी प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून आपल्याला नाहक बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप केला आहे. आपण गाडी पार्किंग करीत असताना पोलीस उद्धटपणे बोलला व शिवीगाळी करण्याचा प्रयत्न केला त्याला आपण समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र विरोधक त्याला वेगळे वळण देवून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपली कोणत्याही पोलीस चौकशीला जाण्याची तयारी असल्याचेही खा. राऊत यांचे चिरंजीव गितेश राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्याने या प्रकरणात सिंधुदुर्ग भाजपने उडी घेतली असून गितेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकला क्लिक करा
www.konkantoday.com