एखाद्याने कमी अधिक उंचीची गणेशमुर्ती आणली तर पोलीसांनी कारवाई करू नये – ना .उदय सांमत
गणेशमुर्ती दोन फुटाची असावी असा शासनाचा आग्रह असला तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हयातील लोक चार पाच महिने गणेशमुर्ती निश्चित करीत असतात. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत घरगुती गणेशोत्सव या दोन जिल्हयात मोठ्या प्रमाणात होतो. गणेशोत्सवाच्या तोंडावर दोन फुटाच्याच मुर्त्या मिळणार नाहीत. त्यामुळे एखाद्याने कमी अधिक उंचीची मुर्ती आणली तर पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. अशी सुचना पालकमंत्री उदय सांमत यांनी सिंधुदुर्ग येथे पोलीसांना दिली.
www.konkantoday.com