
लांजा तालुक्यातील कुरंग-रामेश्वरवाडी येथे घरफाेडी,१ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला
घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे १लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना लांजा तालुक्यातील कुरंग-रामेश्वरवाडी येथे घडली आहे.
तालुक्यातील कुरंग रामेश्वरवाडी येथे श्रीमती लक्ष्मी अनंत विश्वासराव या घरी एकट्याच राहतात. बुधवारी सकाळी त्या घराच्या दर्शनी दरवाजाला कुलूप लावून जवळच असलेल्या दुकानावर खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी कुलपाच्या चाव्या त्यांनी तिथेच भिंतीला अडकवून ठेवल्या होत्या. याचाचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केलात्यानंतर लक्ष्मी विश्वासराव यांच्या झोपण्याच्या खोलीत असलेल्या लोखंडी कपाटातील एक लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोनसाखळी तसेच ३०हजार रुपयांची रोख रक्कम असा १ लाख ३५हजार ५० रुपयांचा ऐवज लांबविला.
www.konkantoday.com