
खेड नगर परिषदेने राजकीय बॅनर्स हटवले
. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून आचारसंहिता जाहीर होण्याच्या शक्यतेने येथील नगर प्रशासन सतर्क झाले आहे. नगर परिषद हद्दीत विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी लावलेले गणेशोत्सव शुभेच्छा बॅनर्स, नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी गुरूवारी हटवून नगर परिषदेत जमा केले. दिवसभर कर्मचार्यांकडून बॅनर्स हटविण्याची कार्यवाही सुरू होती.www.konkantoday.com