रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लावलेले लॉकडाऊन संपले, आजपासून दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहणार सुरू
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत मिशन ब्रेक द चेन च्या नावाखाली कडक लॉकडाउन जाहीर केले होते. मात्र काल रात्री बारा वाजता या लॉकडाऊनची मुदत संपली. आजपासून जिल्हा प्रशासनाचे लॉकडाऊन नसेल. त्यामुळे दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील.मात्र राज्य शासनाने घातलेले निर्बंध कायम राहणार आहेत.
www.konkantoday.com