
रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन येथील रुग्ण महिलांनी वडाच्या अनुषंगाने ऑक्सिजन चे पुजन करून कोविड केअर सेंटर मध्ये वटपौर्णिमा केली साजरी
‘वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य लाभो तुला, जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला’, या ओळींनुसार रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन येथील महिलांनी काल वडाच्या अनुषंगाने ऑक्सिजन चे पुजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य मागितले. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन येथील कोविड सेंटर मध्ये देखील आज वटपौर्णिमा साजरी केली गेली. स्वतःला झालेला आजार विसरून आपल्या पतीसाठी दीर्घायुरारोग्य लाभावे यासाठी कोविड सेंटर मधील महिलांनी वडाची पुजा केली. या उपक्रमाला सहाय्य झाले ते गोगटे काॅलेज मधील २००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी गणेश धुरी, समीर भोसले, प्रशांत सागवेकर, संदेश कांबळे, योगिनी सावंत, निता शिवगण, आणि सहकारी विद्यार्थी, हेल्पींग हँड, आणि कोविड केअर सेंटर्स मधील सर्व कर्मचारी वर्ग यांचे. याच झाडांचे आज कोविड सेंटर परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. याला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि. प. च्या सीईओ जाखड मॅडम, सौ फुले मॅडम आणि कोविड सेंटर मधील सर्व आरोग्य यंत्रणा यांचे विशेष सहाय्य लाभले. महिलांना हे व्रत व्यवस्थित करता यावे यासाठी श्री गणेश धुरी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. दुपारी आणि रात्रीचे विशेष उपवासाचे जेवण देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. वटपोर्णिमेची पुजा झाल्यावर महिलांच्या चेहर्यावरील समाधान खुप काही देऊन गेले.
www.konkantoday.com