
नाणाररिफायनरी प्रकल्पाची आता मागणी करणे म्हणजे “शिळ्या कढीला उत” -आमदार उदय सामंत
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाला हे निश्चित आहे. या गोष्टीला सहा महिने होऊन गेले असून शासनाने तशी अधिसूचनाही काढली आहे आता नाणार रिफायनरी समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाबाबत आपले काहीही मत नाही कारण त्या त्यांच्या भावना आहेत मात्र ज्यावेळी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी मोर्चे निघत होते त्यावेळी रिफायनरीच्या समर्थनांसाठी मोर्चे काढण्यात आले असते तर मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत विचार केला असता आता नाणार येथे रिफायनरी परत आणण्याची मागणी करणे म्हणजे शिळ्या कढीला उत काढण्यासारखे आहे
या मोर्चामागे भाजपची मंडळी आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असे सामंत यांनी सांगितले मात्र आपल्याकडे आलेल्या निवेदनात यात सर्वपक्षीय सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते रत्नागिरी शहराजवळील स्टरलाईटच्या एकशे सात एकर जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प यावेत यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी आपण नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन या ठिकाणी आयटी किंवा अोटो मोबाईल कारखाने यावेत अशी मागणी केली नामदार नितीन गडकरी लवकरच रत्नागिरी दौरा करणार आहेत आयटी सारखे प्रकल्प येथे झाले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकणार आहे असेही सामंत म्हणाले.
www.konkantoday.com