
आंदोलनाचा इशारा देणार्या खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना पोलिसांची नोटीस
रत्नागिरीतील दोन खाजगी रूग्णालयांनी संगमेश्वर येथील रूग्णाला दाखल करून न घेतल्याने या रूग्णाला व त्याच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी हा रूग्ण मृत्यू पावला होता. त्यामुळे खाजगी रूग्णालयानी वेळीच दाखल करून उपचार केले असते तर हा रूग्ण वाचू शकला असता अशी जनतेची भावना होती. याची दखल खेडचे नगराध्यक्ष व मनसे नेते वैभव खेडेकर यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण या खाजगी हॉस्पिटलसमोर येवून आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर खेडेकर यांना खेड पोलिसांनी नोटीस काढली असून त्यामध्ये आपण असे आंदोलन केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकेल. त्यामुळे खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी या नोटीसद्वारे खेडेकर यांना अशा प्रकारे आंदोलन करण्यास मनाई केली व तसे करण्याचा प्र्रयत्न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली असून ज्या घरडा कंपनीत मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण सापडत आहेत ती कंपनी अद्यापही चालू आहे. मात्र सामान्य लोकांच्या बाजूने लढणार्यांना नोटीसा दिली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com