मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट हाेणार- ना.उदय सामंत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेर, जि. रायगडचे डॉ. सचिन पोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती १७जुलै रोजी जिल्ह्यात येऊन कणकवली उड्डाण पुलासह जिल्ह्यातील सर्व पुलांचे ऑडिट करणार आहे. त्याचा अहवाल आठ दिवसांमध्ये समिती देईल. हा अहवाल केंद्राकडे पाठवून दोषींवर कडक कारवाई करू, अशी माहिती ना. उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com