दापोली शहरानजिक एसटी व दुचाकीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

दापोली शहरानजिक काजू फॅक्टरीजवळ झालेल्या मोटरसायकल व एसटी बसच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेजण मृत्यूमुखी पडले. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून दापोली परिसरातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर हा अपघात घडला असून घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button