विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल -राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यानी दिली. राज्यात काही कृषीविद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ चा शिक्का मारण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी, पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती
www.konkantoday.com