गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून द्याव्यात – मनसेचे आमदार राजू पाटील

0
69

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक सण, उत्सवही रद्द करावे लागले आहेत. आता गणेशोत्सव तोंडावर आला असताना त्यावर पण लॉकडाउनचा परिणाम झालेला दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी हे गावी जात असतात. पण कोरोनामुळे चाकरमान्यांच्या गावी जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. आता मनसेनेही गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here