धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील कोरोना बाधितांची आकडा हा आटोक्यात आला आहे. याची दखल थेट WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्यानंतर श्रेयवाद हा चांगलाच पेटला आहे. हा श्रेयवादाचा सामना आता शिवसेना विरुद्ध भाजपा अश्याया वळणावर येत आहे. चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासोबत अनेक भाजपा नेत्यांनी हे श्रेय RSS च्या स्वयंसेवकांना जाते असे म्हणले असून यानंतर शिवसेना देखील प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाली आहे.नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले. तसेच, धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती असल्याची टीकाही शेवाळे यांनी केली
www.konkantoday.com