माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर करोना मुक्त कर महाराजा -मंत्री उदय सामंत यांचे ट्विटरवर गाऱ्हाणे
सध्या काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे देश संकटात आहे महाराष्ट्रातही सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांडुरंगाला देशातून व राज्यातून कोरोना जाऊ दे असे भावनिक आवाहन केले होते आता उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील ट्विटरवरून देशातून व राज्यातून कोरोनाचा राक्षस जाण्यासाठी चक्क गार्हाणे घातले आहे
ट्विटरवर तशी पोस्टच त्यांनी टाकली आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून हे गाऱ्हाणे घातलं आहे. मंत्री सामंत यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘बा देवा महाराजा… व्हाय महाराजा… ह्यो जो काय करोनाचो राक्षस जगात, देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो तो बंदोबस्त कर रे महाराजा… पॉझिटिव्ह इले त्येंका निगेटिव्ह कर, निगेटिव्ह इले त्येंका सुखरूप ठेव रे महाराजा…माझ्या पोरांच्या परिक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा… चाकरमान्यांका गणपतीचं दर्शन होऊ दि रे महाराजा… ह्योच्यात जर कोणी आडो इलो तर त्येका उभो कर, उभो इलो तर त्येका आडो कर रे महाराजा… एकाचे एकवीस कर… पाचाचे पंचवीस कर…पण माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर करोना मुक्त कर महाराजा… व्हय महाराजा…,’ असं गाऱ्हाणंच सामंत यांनी ईश्वराला घातले आहे.
www.konkantoday.com