जे. के. तालबोटमधील कामगारांच्या पगारासंबंधी आ. शेखर निकम यांनी लक्ष घातले
कामाचा मोबदला शंभर टक्के मिळावा यासाठी चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील जे. के. तालबोट कंपनी व्यवस्थापन व स्थानिक कामगारांमध्ये गेले तीन दिवस संघर्ष सुरू आहे. कंपनीने गेटला टाळे ठोकत कामगारांना बाहेरच ठेवल्याने हा वाद चिघळला होता. याविरोधात कामगारांनी गेटसमोरच ठिय्या मांडत न्यायासाठी आंदोलन छेडले आहे. याबाबत रविवारी आ. शेखर निकम यांनी आपल्या सहकार्यांसह आंदोलनकर्त्यांची भेट घेत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. सकारात्मक चर्चा घडल्याने कामगारांच्या पगाराचा गुंता सुटण्याच्या मार्गावर आहे.
www.konkantoday.com