राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती
कुलगुरूंच्या सल्ल्यानेच पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला असताना राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या (यूजीसी) भूमिकेचा हवाला देत परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून कुलपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती कुलगुरूंनी राज्यपालांना १० जुलैला लिहिलेल्या पत्रात केली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यास मान्यता दिली असतानाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट के ले हाेते. तसेच विद्यापीठांच्या कु लगुरूंच्या सल्ल्यानेच हा निर्णय घेतल्याचा त्यांनी सांगितले हाेते या पार्श्वभूमीवर कु लगुरूंनी एकत्र येत खुद्द राज्यपालांनाच परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com