गुहागर-विजापूर महामार्गावर रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला तडे
गुहागर-विजापूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे पावसामुळे चिखलाचे साम्राज्य, वाहने घसरण्याचे प्रकार, मोर्यांची अर्धवट कामे, रूंदीकरणात अंतर्गत जोडरस्त्यांची झालेली वाताहात, रखडलेला मोडकाघर पूल या कारणांनी सतत चर्चेत असलेल्या महामार्गावर सिमेंट कॉंक्रीट रस्त्याला पहिल्याच पावसात तडे गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
konkantoday.com