उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिशन विदर्भाच्या नावाखाली विदर्भात आपल्या शक्तीची चाचपणीच सुरू केली

. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिशन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिशन विदर्भाच्या नावाखाली विदर्भात आपल्या शक्तीची चाचपणीच सुरू केलीविदर्भाच्या नावाखाली विदर्भात आपल्या शक्तीची चाचपणीच सुरू केली आहे. इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करण्याची रणनीती ही आखली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूर अशा तीन मतदारसंघांवर दावा केलाय. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी कामठी, हिंगणा, रामटेक, आणि उमरेड तब्बल चार विधानसभा क्षेत्रांमध्ये आमचे उमेदवार राहतील, असा दावा उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मिशन विदर्भ काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार, अशीच सध्याचे चिन्ह दिसत आहेत.नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारामधून शेकडो इच्छुक नागपुरात दाखल झाले आहे. ही स्वबळाची तयारी नसून पक्षाच्या क्षमता आणि शक्तीची चाचपणी असल्याचे मत भास्कर जाधव यांनी बोलताना व्यक्त केले आहे.दरम्यान, आता शिवसेनेचा डोळा फक्त नागपूर मधील काही जागांवरच नाही आहे, तर पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील 30 विधानसभा क्षेत्रांपैकी किमान 14 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डोळा आहे. ज्या 14 जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. त्या जागांवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे मतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केल्याने विदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात स्वतःला मोठा भाऊ समजणाऱ्या काँग्रेस वर दबाव वाढला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button