राजगृहावर दगडफेक करून नुकसान करणाऱ्या समाज कंटकाला कडक शासन करा-खेड युवा अध्यक्ष रिपाइं नेते विकास धुत्रे
खेड प्रतिनिधी/ रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार मातोश्री रमाबाई नगर मुंबई हत्याकांडातील शहिदाना अभिवादन करून महाराष्ट्र राज्यात व देशात दलित व बौद्ध समाजावर वाढणाऱ्या व होणाऱ्या अन्याय आत्याचाराच्या निषेधार्थ तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले राजगृह दगडफेक करून नुकसान करणाऱ्या समाजकंटकाला कडक शासन झाले पाहिजे या संदर्भात खेड तालुकातील प्रमुख पदाधिकारी शिष्टमंडळाने खेड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. सुवर्णा पत्की तसेच खेड दंडाधिकारी सो. प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले, तरी या महाआघाडी सरकारच्या विरोधात खेड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष मा रजनीकांत जाधव युवक अध्यक्ष पँथर विकास धुत्रे रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मिलिंद जी तांबे साहेब युवा नेते गणेश शिर्के आणि सुरेंद्र तांबे आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com