सरकारांच्या विरोधानंतरही विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम
देशभरातील विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच राज्य सरकारांच्या विरोधानंतरही विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा दोन्ही प्रकारे परीक्षा घ्या पण 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्यायला हव्यात असे सांगतानाच यूजीसीने परीक्षेच्या वेळी घेण्याच्या सुरक्षा उपायांच्या सूचनाच जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com