कोकणातील कँन्सर रूग्णांसाठी “आँन्को लाईफ केअर कँन्सर सेंटर,” चिपळूण येथे सज्ज

महाराष्ट्रातील सर्वोत्तम कँन्सर रूग्णालय पुरस्कारप्राप्त सातारा येथील आँन्को लाईफ कँन्सर सेंटर व लाईफकेअर रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कँन्सर सेंटरची स्थापना. अतिशय अल्पावधीत रूग्णांचा विश्वास संपादन करून नावारूपाला आलेल्या सातारा येथील आँन्को लाईफ कँन्सर केअर सेंटर आता कोकणातील कँन्सर रूग्णांना आधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवी डाँक्टराच्या साथीने उपचार सेवा देण्यासाठी लाईफकेअर हाँस्पिटल यांच्या सहयोगाने आँन्को लाईफ कँन्सर केअर सेंटर ची सुरूवात करत असून कँन्सरवरील सर्व उपचार याठिकाणी करण्यात येतील अशी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपिठावर आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री.उदय देशमुख, संचालक डॉ श्री.प्रताप राजेमहाडीक,लाईफकेअर हाँस्पिटलचे संचालक डाँ.इसहाक खतीब, डॉ समीर दळवी,डॉ श्री विष्णू माधव व डॉ सौ सायली माधव,आणि डॉ शमशुद्दीन परकार डॉ सिध्येश त्रयंबके मान्यवर उपस्थित होते.

आँन्कोलाईफ कँन्सर केअर सेंटर येथे अद्ययावत तंत्रप्रणालीसह, अनुभवी डाँक्टरांच्या सहाय्याने रेडिएशन, केमोथेरपी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ७००० चौरस फूट जागेत ओपीडी, रेडीएशन, प्रतिक्षा विभाग असणार आहे. तसेच, ज्या रूग्णांची आर्थिक स्थिती कमकूवत आहे अशा रूग्णांना सरकारच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध असेल.

लाईफ-केअर हाँस्पिटल हे चिपळूण शहरातील पहिले मल्टिस्पेशालिटी रूग्णालय २०१३ ला डाँ.इसहाक खतीब तसेच इतर संचालकांनी मिळून सुरू केले. अगदी ५ वर्षाच्या कालावधीत अत्याधुनिक उपचारप्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक रूग्णांपर्यत तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांपर्यत एक सकारात्मक विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहे. पंरतू, कँन्सर उपचारप्रणाली या ठीकाणी नसल्याने लाईफ-केअरसोबत आपण कोकणातील रूग्णांना ही उपचारपध्दतीही उपलब्ध करून दिल्यास येथील रूग्णांना मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच, कर्करोगाचे कमी वेळात निदान होऊन त्वरीत उपचारही सुरू होऊ शकतील आणि त्यादृष्टीने आँन्को लाईफ-केअरच्या माध्यमातून एक विश्वास कर्करोगग्रस्त रूग्णांमध्ये निर्माण करता येऊ शकेल म्हणून आँन्को लाईफ केअरची सुरूवात करण्यात आली आहे.

लाईफ-केअर हाँस्पिटल गेल्या ५ वर्षात २०हून अधिक स्पेशालिटीच्या माध्यमातून रुग्णालयात येणा-या प्रत्येक रूग्णाला उत्तमोत्तम सेवा देत आहे. बदलती जीवनशैली आणि आजारांच स्वरूप यावर मात करण्यासाठी हदयरोगापासून ते आयव्हीएफ उपचारप्रणालीपर्यत तर डायलिसिस पासून ते कॅथलॅब पर्यंत तज्ञ डाँक्टर व यंत्रणा आम्ही उपलब्ध केलेली असून येथे येणारा रूग्ण,डाँक्टर अथवा इतर सुविधा नाहीत म्हणून पुन्हा निराश होऊन जाऊ नये हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरूवातीपासूनच आहे. म्हणून आमच्याकडे कँन्सर आजारावर उपचारही व्हावेत जेणेकरून कोकणातील रूग्णांना यापुर्वी मुंबई अथवा पुण्याला उपचार घेण्यासाठी जावे लागत होते ती दगदग कमी होईल आणि म्हणूनच कर्करोग आजारावर आजपर्यत अनेक रूग्णांवर यशस्वी उपचार केलेले ‘आँन्को लाईफ कँन्सर सेंटर, सातारा’ यांच्यासोबत बोलणे झाले आणि त्यांच्या मदतीने कर्करोग आजारावरही रूग्णांना आता उपचार मिळू शकतील ही खूप आशादायक बाब असल्याचे प्रतिपादन डाँ.इसहाक खतीब, व्यवस्थापकीय संचालक, लाईफकेअर हाँस्पिटल यांनी व्यक्त केले.

श्री.उदय देशमुख, संस्थापक तसेच व्यवस्थापकीय संचालक आँन्को लाईफ कँन्सर सेंटर म्हणाले की, अल्पावधित आम्ही आँन्को लाईफ कँन्सरच्या माध्यमातून अनेक रूग्णांचा विश्वास संपादन केला असून रूग्णांना मानसिक आधारासह अत्याधुनिक उपचारसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. एन.ए.बी.एच मानांकन प्राप्त रूग्णालयासह महाराष्ट्रातील सर्वोत्तम कँन्सर रूग्णालाचा पुरस्कार आम्हाला मिळाला तो आमच्या उपचारप्रणालीमुळे कर्करोगावरही मात करू शकणा-या रूग्णांमुळेच. पुर्वी कर्करोग म्हटल्यावर रूग्ण आणि नातेवाईक पुर्णत: कोलमडून जायचे परंतू आता जनमानसात त्याबद्दल झालेली जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या रूग्णांचे जीवनमानही वाढले आहे. आतापर्यत आँन्को च्या माध्यमातून आम्ही 7000 हून अधिक रूग्णांना यशस्वी उपचार दिले असून हीच सेवा कोकणातील रूग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही चिपळूण मध्य केंद्र समजून आँन्को लाईफ केअरची सुरूवात करत असून उत्तमोत्तम सुविधा आणि उपचाराच्या माध्यमातून जन-मानसातील कँन्सर आजाराची भिती दूर करण्याच मिशन आम्ही हाती घेतल असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत. रूग्णसेवा हा एकमेव उद्देश बाळगून अधिकाधिक जनजागृती करण्यावर आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

लाईफकेअर हाँस्पिटल यांच्याविषयी –

लाईफकेअर हाँस्पिटल हे चिपळूण शहरातील पहिले मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. २० मुख्य व उप स्पेशालिटीसह उच्चशिक्षित आणि अनुभवी तज्ञ डाँक्टरांसह २०१३ मध्ये या रूग्णालयाची स्थापना करण्यात आली.

२५ हजार चौरस फुट इतक्या प्रशस्थ जागेत ही इमारत उभारली असून अद्ययावत तंत्रज्ञानासह अतिदक्षता विभाग, हदयविकार उपचारासाठी आवश्यक कँथलँब( एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी ,पेसमेकर) डायलेसिस आणि दुर्बिनिद्वारे शस्त्रक्रिया सुविधा नैसर्गिकरित्या गरोदरपणासाठी अडथळा येणा-या जोडप्यांसाठी आयव्हीएफ, सिटीस्कँन आणि रक्तपुरवठा सुविधाही उपलब्ध आहे.

आँन्को लाईफ कँन्सर सेंटर, सातारा यांच्याविषयी –

‘आँन्को लाईफ कँन्सर सेन्टर, सातारा’ या सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना तीन वर्षापुर्वी ५२ बेडच्या रूग्ण क्षमतेसह रेडीएशन,शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या अशा स्वरूपात झाली. या तीन वर्षाच्या कालावधीत हॉस्पिटलने अनेक आव्हानात्मक रूग्णांना सर्वोत्तम उपचार देऊन रूग्णांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे व या विश्वासाच्या बळावरच हॉस्पिटलने तब्बल सात हजारहून अधिक रूग्णांना सेवा पुरविली असून पेट सिटी स्कँन सारखी अद्ययावत उपचार पध्दती उपलब्ध करून देणारे पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच हॉस्पिटल आहे. अनेक सामाजिक उपक्रमांव्दारे कर्करोगाबाबत अधिकाधिक जनजागृतीसाठी हॉस्पिटल अधिक प्रयत्नशील असून हल्लीच रूग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले एन.ए.बी.एच. मानाकंनसुद्धा मिळविले आहे.हॉस्पिटलमधील स्वच्छता हि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉस्पिटलच्या बरोबरीचीच आहे. तसेच ब्रॅकी थेरपी सारखी आधुनिक उपचारप्रणाली देखील येथे उपलब्ध आहे याशिवाय आता या ठिकाणी नव्यानेच ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ व ‘गामा कॅमेरा’ सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button