
रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने प्रायश्चित म्हणून १४ जुलैला सत्याग्रह आंदोलन करणार, जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने लावलेल्या लॉकडाऊनमुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाने घेतलेल्या मनमानी आणि तुघलकी निर्णयाविरोधात रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसने सत्याग्रह आंदोलन छेडण्याचे ठरविले असून १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ वा. सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी दिली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढविताना प्रशासनाने जिल्हयात महाविकास आघाडीत असलेल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक होते. परंतु त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. कोकणात आता गणेशोत्सवाची तयारी सुरू होईल त्याबाबत प्रशासनाची काही भूमिका आहे की नाही हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा बाप्पावरही लॉकडाऊन लादणार का? असा सवाल त्यांनी केला असून या लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल झाले असून अनेकांची मजूरीही गेली आहे. त्याचे प्रायश्चित म्हणून जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. शासनाचे सुरक्षिततेचे नियम व सुरक्षित अंतर ठेवून सत्याग्रह करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com