
धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे
www.konkantoday.com