
लांजा-कोर्ले फाटा-आसगे दाभोळे रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा, आमदार राजन साळवी यांची मागणी
आसगे-दाभोळे रस्त्याची दुरावस्था झाली असून पावसाळ्यादरम्यान वाहतुकीसाठी गैरसोय होत असल्याचे शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संदीप दळवी, जि.प. माजी सभापती चंद्रकांत मणचेकर, युवासेना तालुकाधिकारी तथा विभाग संघटक प्रसाद माने, उपविभागप्रमुख विश्वास मांडवकर, केतन खंदारे, युवती तालुकाधिकारी दिपाली दळवी यांनी ही बाब आमदार राजन साळवी यांच्या निदर्शनास आणली होती. या संदर्भात आमदार राजन साळवी यांनी उत्तर रत्नागिरी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेतली. व तत्काळ खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. www.konkantoday.com