एकूण कोरोना बाधित 839,542 बरे झाले, एक मृत्यू
रत्नागिरी दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 839 असून 8 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांची संख्या आता 542 झाली आहे. दरम्यान एका 42 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताची संख्या आता 29 झाली आहे.
कोरोना सोबत श्वसन प्रक्रिया बंद होवून मरण पावलेला हा रुग्ण कुर्धे, पावस येथील होता. सदर रुग्ण 26 जून 2020 रोजी मुंबईहून आला होता. त्याला 4 जुलै 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेपासून तो व्हेंटीलेटरवर होता.
आज बरे झालेल्यांमध्ये 4 दापोली, 1 रत्नागिरी व 3 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 839
बरे झालेले – 542
मृत्यू – 29
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 268
पैकी 09 रुग्ण होम आयसोलेशन,
3 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 53, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 13, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 6, ग्रामीण रुग्णालय गुहागर-3, केकेव्ही, दापोली – 5 असे एकूण 84 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 14 हजार 596 इतकी आहे.
10 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 816 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 622 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 839 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 10 हजार 748 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 194 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 194 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 09 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 73 हजार 091 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 92 हजार 212 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 10 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.
0000