कोरोना बाधितांची संख्या 361, आज 18 रुग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 07 – काल सायंकाळपासून आजपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 79 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 361 झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांचे विवरण खालील प्रमाणे संगमेश्वर 9,राजापूर 2,कामथे 6,रत्नागिरी 1.दिवसभरात 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 167 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज अखेर 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ऍ़क्टीव्ह रुग्णांची संख्या 181 आहे.


कन्टेंनमेन्ट झोन

जिल्ह्यात सध्या 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये,गुहागर तालुक्यामध्ये 8 गावांमध्ये, खेड तालुक्यात 16 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 23 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये 2 गावामंध्ये, दापोली मध्ये 16 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 8 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 11 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.


संस्थात्मक विलगीकरण


संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 47, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 8, उपजिल्हा रुग्णालय कामथे – 8, उपजिल्हा रुग्णालय कळबणी -5, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 5, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 2, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर – 1, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 3 असे एकूण 79 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाईन संख्या
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 62 हजार 721 इतकी आहे.
6890 नमुन्यांची तपासणी
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 6 हजार 890 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 464 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 361 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 94 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 426 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 426 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे तर 422 अहवाल मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 06 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 31 हजार 976 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 50 हजार 672 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्हयात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे.
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 22 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button