
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरी मध्ये व्हावे भाजपाने केली मागणी..
रत्नागिरी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जनशताब्दी वर्ष सुरु होत असून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचा जन्मजयंती दिवस 25 डिसेंबर रोजी संपूर्ण देशामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
तरी अश्या व्यक्तीमत्वाचे स्मारक रत्नागिरी मध्ये असेल तर ते आपणास सर्वांसाठी अभिमानाचे असणार आहे तरी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावे किंवा एखादया संस्थेला किंवा भारतीय जनता पार्टीला जागा उपलब्ध करून दिल्यास, आम्ही यासाठी प्रयत्न करू तरी आम्ही केलेल्या मागणीचा विचार व्हावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष दादा दळी, अशोक वाडेकर नंदकिशोर चव्हाण, दादा ढेकणे, संदीप सुर्वे मंदार खंडकर, तुषार देसाई, बावा नाचणकर, ययाती शिवलकर, निलेश आखाडे आदी भाजप कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना भेटून केली आहे.