
घरावर पडलेले झाड बाजूला काढताना जखमी झालेल्या इसमाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
रत्नागिरी शहराजवळील आंबेशेत कुर्टे वाडी येथे घरावर पडलेले झाड बाजूला काढत असताना त्याची फांदी अंगावर पडल्याने खाली पडून जखमी झालेल्या दिनेश वाडेकर राहणार आंबेशेत यांच्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला
आंबेशेत येथील राहणारे लहू रायकर यांच्या घरावर पावसात झाड कोसळले होते हे झाड काढण्यासाठी दिनेश हा आपल्या सहकाऱ्यांसोबत येथे गेला होता घरावर पडलेल्या झाडाला मोठी दोरी बांधण्यात आली ही फांदी बाजूला करण्यासाठी दिनेशने दोरी ओढली असता या फांदीचा धक्का त्याला लागून तो खाली पडून बेशुद्ध झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात देण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला
www.konkantoday.com