एमआयडीसीतील सर्वच कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावे: आ.शेखर निकम
खेर्डी एमआयडीसीतील थ्री एम पेपर मिलने ४७ कामगार उत्तर प्रदेशमधून आणले, ते कसे आणले, परवानगी होती का, पास होता का, याबाबत प्रशासन चौकशी करेल. स्थानिक लोकांच्या आरोग्याबाबत कसलाही हलगर्जीपणा होता कामा नये, हेही महत्त्वाचे आहे. त्याहीपेक्षा पिंपळीमधील काही कामगार पेपर मिलमधून कमी केले गेले, स्थानिक कामगार असताना दुसर्या राज्यातून कामगार करण्याचा इतकी घाई का, असा सवाल आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केला आहे. लोटे, खेर्डी, गाणे खडपोली एमआयडीसीतील सर्वच कारखान्यात शासनाच्या नियमाप्रमाणे ८० टक्के स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी महत्वपूर्ण भूमिका या निमित्ताने भूमिका आमदार निकम यांनी मांडली आहे. थ्री एम पेपर मिलमध्ये एवढ्या प्रमाणात कामगार लागत असतील तर त्यांनी स्किल की अनस्किल हवेत हे सांगावे, आम्ही त्यांना कामगार उपलब्ध करून देऊ, स्थानिक तरुण बेरोजगार असताना बाहेरून कामगार आणण्याची काही आवश्यकता नाही, ही भूमिका सर्वच कंपन्यांनी घ्यायला हवि. स्थानिकांना पगार कमी द्यायचा आणि बाहेरून बाहेरून आणलेले कामगार यांना अधिक पगार द्यायचा हा कुठला न्याय, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनीही या विषयात लक्ष द्यावे, स्थानिकांना थ्री एम पेपर मिलमध्ये प्राधान्य द्यावे, स्थानिक पातळीवर हा विषय संपला नाही तर आपण उद्योगमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू, अशी माहितीही शेखर निकम यांनी दिली आहे.
www.konkantoday.com