सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारांसाठी ऑडिओ कॉन्फरेन्स च्या द्वारे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घायवयाची काळजी याची माहिती
मासेमार हा नेहमी समुद्रामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी वादळ, कधी बोट मधेच बंद होणे, बोटीचे अपघात होणे अशा घटना समुद्रामध्ये होत असतात. अशा वेळी मासेमार खूप संकटात सापडत असतो. त्यामुळे अशा संकटावेळी मासेमारांनी काय करायला हवे, कोणाला तात्काळ संपर्क करायला हवा याची माहिती देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल रत्नागिरी , मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओ कॉन्फरेन्स ने मासेमार व तज्ञ् व्यक्तींना घरबसल्या जोडून माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे ऑपेरेशन ऑफिसर रत्नागिरी श्री नरेश कुमार हे मुख्य तज्ञ् मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. श्री नरेश कुमार यांनी मासेमारांना समुद्रामध्ये जाताना घ्यावयाची काळजी , आपत्कालीन परस्थितीतमध्ये मासेमारांच्या कोस्ट गार्ड ला संपर्क कसा साधावा , समुद्रामध्ये संशयास्पद बोटी किंवा हालचाल दिसल्यास काय करावे, समुद्रामध्ये बोटीला अपघात किंवा बोट बिघडली तर संपर्क कसा साधावा व इतर बोटीना इशारा कसा द्यावे याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. नागनाथ भादुले यांनी मासेमारांना किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती दिली. या माहितीमध्ये किसान क्रेडिट कार्ड ला कसे अर्ज करावे, कर्जाची मुदत, व्याजदर, पात्र मासेमार याची संपूर्ण माहिती मासेमारांना दिली. कार्यक्रमाचे नियोजन तारामुंबरी मासेमार सहकारी सोयायटी देवगड चे व्यवस्थापक श्री अरुण तोरसकर यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, तेजस डोंगरीकर व गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड, मालवण व वेंगुर्ला तालुक्यातील मासेमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सागरी हवामान , शाशकीय योजना व शेती , पशुपालन व इतर माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या निशुल्क क्रमांक १८००४१९८८०० वर सोमवार ते शनिवार सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत संपर्क साधावा असे आव्हाहन रिलायन्स फाउंडेशन मार्फत करण्यात आले