नदीला आलेल्या पुरात सुमारे ८० पेक्षा जास्त महिला व पुरुष शेतकरी अडकले,चाकाळे गावातील धाडसी तरुणांनी सुखरुप साेडवले
खेड तालुक्यातील चाकाळे व चिंचघर गावांच्या मधून वाहणार्या नारिंगी नदी किनारी शनिवारी सायंकाळी भातशेती लावण्यासाठी शेकडो शेतकरी गेले होते. याचदरम्यान अतिवृष्टीमुळे अचानक नदीला आलेल्या पुरात सुमारे ८० पेक्षा जास्त महिला व पुरुष शेतकरी अडकून पडले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चाकाळे गावातील धाडसी तरुणांनी त्यांना मानवी साखळी बनवून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यातून यशस्वीपणे बाहेर काढले. खेड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे नद्या व पावसाळी नाले तुडूंब भरून वहात आहेत.
www.konkantoday.com