जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी
लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशात करोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं असून, रविवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.
www.konkantoday.com