
जयगडचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम रद्द
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय जयगड राजा गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या जयगडचा राजा यंदा विराजमान होणार नाही. लालबागचा राजा मंडळाने यंदा गणेशमूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकहिताच्या या निर्णयाच जयगडचा राजा मंडळाने स्वागत केले आहे. या मंडळामार्फत गणेशोत्सवाच्या कालावधीत आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या कालावधीत जयगड पंचक्रोशीत कोरोना प्रतिबंधासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
konkantoday.com