लांजा येथील प्रदीप काेवळे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
लांजा येथील जुनी बाजारपेठेत राहणारा प्रदीप उर्फ राजू कोवळे याने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रवीण डंबे व श्रीमती प्रज्ञा कोवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
यातील मयत प्रदीपची पत्नी हिचे प्रदीपचा मित्र प्रवीण डंबे यांच्यात अनैतिक संबंध असल्याने त्यावरून प्रदीप व त्याची पत्नी प्रज्ञा यांच्यात वाद झाले त्या त्रासाला कंटाळून व समाजात इज्जत जाईल व बदनामी होईल या कारणाने प्रदीप याने आपल्यावर रहात्या घरात माजघरात लाकडी वाशाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती याबाबत मयत प्रदीप यांच्या भावाने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com