राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, काल राज्यात ७०७४ नवे कोरोनाबाधित रूग्ण
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काल राज्यात ७०७४ नवे कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत. हा सर्वात मोठा आकडा असून राज्यात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. राज्यात आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील ममृयदूर ४.३३% एवढा आहे.
आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १,०८,०८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०२ % एवढे झाले आहे
www.konkantoday.com