रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 14 नवे रुग्ण,दोन रुग्णांचा मृत्यू,23 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले

रत्नागिरी दि. 05 (जिमाका): काल सायंकाळपासून 14 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 2 जणांचा मृत्यू झाला. एकूण बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 484 झाली असून आज बरे झालेल्या 23 रुग्णांचे विवरण पुढीलप्रमाणे

कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण – 10

जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 2

कोव्हीड केअर सेंटर, पेंडांबे – 10

कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 1

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल

जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 6

उपजिल्हा रुग्णालय,कामथे – 6

उपजिल्हा रुग्णालय कळंबणी -2 आज दाभोळ, ता. दापोली येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचे वय 60 वर्षे होते. रुग्णाला मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू येथे दाखल होण्यापूर्वी झाला. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅब चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आंजर्ले येथे काम करणाऱ्या एका आरोग्य सहाय्यकाला 1 जुलै रोजी ॲडमिट करण्यात आले होते. त्याला ताप व श्वसनाचा त्रास होता.त्याला कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथे व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. यामुळे जिल्हयातील मृत्यूंची संख्या 28 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 710

बरे झालेले – 484

मृत्यू – 28

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 198 ( पैकी 04 रुग्णांवर रुग्णालयाबाहेर उपचार सुरु आहे.)

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन जिल्ह्यात सध्या 49 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 21, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी - 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 1, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी - 1, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल - 12, ग्रामीण रुग्णालय गुहागर-1, केकेव्ही, दापोली - 3 असे एकूण 40 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 17 हजार 131 इतकी आहे.

नऊ हजार निगेटिव्ह जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 10 हजार 664 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 10 हजार 414 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 710 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 9 हजार 669 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 250 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 250 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 05 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button